एका विषाणूमुळे संपूर्ण जग हादरले आहे. भारतात सध्या करोनाचे एकूण ३९३ रुग्ण सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. हा विषाणू अधिकाधिक पसरू नये म्हणून जनतेला घरीच राहण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत ज्यांच्या तळहातावर पोट आहे, अशा लोकांचे हाल झाले आहेत. सध्याच्या स्थितीवर भाष्य करणारी मार्मिक कविता ‘धुरळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी लिहिली आहे.

‘तुझं बाबा बरंय..’ असं या कवितेचं शीर्षक आहे. नाक्यावरच्या फुलवालीच्या नजरेतू समीर विद्वांस यांनी ही कविता लिहिली आहे. नोकरीवर असणाऱ्यांना महिन्याअखेर पगार तरी हातात येईल, मात्र ज्यांचं तळहातावर पोट आहे, अशा लोकांना बाहेर जाऊन काम करण्याशिवाय काही पर्याय नाही, याची जाणीव या कवितेतून होते. त्यांच्यासाठी हा प्रश्न केवळ आजचा नाही तर रोजचाच आहे.

वाचा संपूर्ण कविता- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना मोठं आवाहन केलं. ‘संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्यांचं पोट हातावर आहे, त्यांचं किमान वेतन कापू नका, असं विनम्र आवाहन ठाकरे यांनी केलं होतं.