टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेचच सिक्वलची घोषणा झाली. ‘बागी २’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच आता तिसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली. ‘बागी ३’ असं तिसऱ्या भागाचं नाव असून यामध्येही टायगर श्रॉफची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

साजिद नाडियादवाला निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित या तिसऱ्या भागातील अभिनेत्रीचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं. ‘बागी २’चेही दिग्दर्शन अहमद खान करत असून टायगरची कथित प्रेयसी दिशा पटानी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यावर्षी ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

वाचा : ‘राहत फतेह अली खान यांच्यासह इतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला’

बऱ्याचदा चित्रपटाला मिळणाऱ्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पुढच्या भागाची घोषणा केली जाते. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ने बॉक्स ऑफीसवर जेमतेम गल्ला जमावला होता. प्रेक्षक- समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलच्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता लगेचच तिसऱ्या भागाचीही घोषणा झाल्याने सोशल मीडियावर त्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.