कन्नड सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्या जगदीश रविवारी (१४ एप्रिल रोजी) त्यांच्या बंगळुरूमधील घरी मृतावस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते ५५ वर्षांचे होते. या घटनेमुळे कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौंदर्या जगदीश मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांचा मृतदेह राजाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेला होता, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी महालक्ष्मी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे, यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. सौंदर्या जगदीश यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.

Salman Khan: हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी कुणाच्या नावावर? वांद्रे स्थानकावरून ते कोणत्या दिशेने गेले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

दरम्यान, नुकतेच सौंदर्या जगदीश वादात सापडले होते. त्यांचा जेट लॅग नावाचा पब आहे, तो पब परवानगी नसतानाही ठराविक वेळेपेक्षा जास्त काळ चालवल्याचा आरोप झाला होता. परवानगी नसलेल्या वेळेत पार्टी आयोजित केल्याबद्दल पबवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्टीत लोकप्रिय अभिनेते दर्शन, धनंजय, रॉकलाइन व्यंकटेश आणि इतर कलाकारही उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी दर्शनची चौकशी केली होती आणि आरोपपत्रात ती पार्टी नाही तर डिनर पार्टी होती, असं म्हटलं होतं.

गोळीबारानंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार? मोठी माहिती आली समोर

जगदीश यांनी ‘अप्पू पप्पू’, ‘स्नेहितरू’, ‘रामलीला’ आणि ‘मस्त मजा माडी’ यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. ते कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रिय निर्मात्यांपैकी एक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. अनेक कन्नड कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous producer soundarya jagadish found dead at his home in bengaluru hrc