‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २ मेपासून सुरू होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहेच, याशिवाय प्रोमोतील गाणीही विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठी वाहिनीवरील पहिलीच संगीतमय मालिका ठरणार असून खास या मालिकेसाठी १८ गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत.

छोटय़ा स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रित झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली स्वरा आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे अशा सुप्रसिद्ध गायक मल्हारचा सांगीतिक प्रवास दाखवणारी ही मालिका आहे. त्यामुळे गाणं हा या मालिकेचा आत्मा आहे. या मालिकेसाठी एक दोन नाही तर आत्तापर्यंत तब्बल १८ गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा मानस आहे. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे.

colors marathi announces new marathi serial abeer gulal
नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!

प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजित, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन – रोहन, चिनार – महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या स्वरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अश्विनी शेंडे, श्रीपाद जोशी, दीप्ती सुर्वे, समीर सामंत या दिग्गज लेखकांच्या लेखणीतून ही गाणी साकारली आहेत.

‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी कथानकासोबतच एक सांगीतिक पर्वणी असेल. मराठी मालिका विश्वातल्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश जवाडे म्हणाले, ‘ही मालिका म्हणजे अत्यंत भावनाप्रधान गोष्ट आहे जी मनाला भिडते, जी संगीताने बांधली गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या सहा दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी या मालिकेला संगीत दिलं आहे. असा योग याआधी आलेला नाही. यातली गाणी मालिकेची कथा आणि भावना पुढे घेऊन जातात.’ ‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत या मालिकेची निर्मिती ‘ट्रम्प कार्ड स्टुडिओ’ची असून केदार वैद्य ही मालिका दिग्दर्शित करत आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवीन मालिका २ मेपासून रोज रात्री ९ वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहता येणार आहे.