दोन मालिका एकत्र आणून त्याचा महासंगम म्हणजेच एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची कल्पना अनेकांनाच आवडते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या लोकप्रिय मालिकांचा महासंगम येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या दोन मालिकांच्या कथानकातला ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवेल.

छोटी मालकीण या मालिकेत सुरेशच्या शोधात असलेले त्याचे आई-वडील गोठ मालिकतेल्या म्हापसेकरांकडे येतात. बयोआजीला भेटतात. राधा त्यांना तिथं पाहते. गोठमधली राधा आणि छोटी मालकीणची रेवती या दूरच्या मावसबहिणी आहेत. त्यामुळे राधा नीलाच्या चोरओटीच्या कार्यक्रमासाठी रेवतीला आमंत्रण देते आणि त्याचवेळी सुरेशच्या आई-वडिलांना पाहिल्याचं सांगते. रेवतीलाही सुरेशला भेटण्याची इच्छा असते. नीलाला भेटण्याचा प्रयत्न करणारा निखिल आणि श्रीधर यांच्यात मारामारी होते. श्रीधर आणि रेवती नीलाच्या चोरओटीच्या कार्यक्रमासाठी म्हापसेकरांच्या घरी आल्यानंतर तिथं काय नाट्य घडतं, हे महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर

Veere Di Wedding trailer: करिना आणि तिच्या गर्ल्स गँगचा ‘लव्ह, लग्न आणि लोचा’

गोठ आणि छोटी मालकीण या दोन मालिका एकत्र आणून त्याची एक कथा गुंफणं ही अनोखी कल्पना आहे. या मालिकांच्या महासंगममध्ये काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.