लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाल्यानंतर देशभरात उरलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराला वेग आला आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे. अगदी बारामतीमध्येही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक नसून ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असा प्रचार भाजपाच्या नेत्यांनी केला. महाराष्ट्राच्या इतरही मतदारसंघात अशाच प्रकारचा प्रचार केला जात आहे. मात्र कोल्हापूरच्या कागलमध्ये जाहीर सभेत असाच प्रश्न विचारला असता सभेतील उपस्थित कार्यकर्त्याने दिलेले उत्तर ऐकून भाजपाच्या नेत्यानांही हसू आवरले नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफही यावेळी खळखळून हसताना दिसले.

कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून खुद्द पंतप्रधान मोदींची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्याच नावाने जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यामुळे “मान गादीला आणि मत मोदींना”, अशीही घोषणा कोल्हापूरमध्ये दिली गेली. त्यानंतर आता कागलच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

satara lok sabha marathi news
अजित पवारांनी आयत्यावेळी शब्द फिरवल्याने साताऱ्यात नाराजी
dayanidhi Maran slams amit shah
“हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” ‘त्या’ व्हिडीओवरून माजी केंद्रीय मंत्र्याने अमित शाहांना सुनावलं!
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Ajit Pawar
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “अपयशाने…”,
lok sabha election results 2024 bjp leaders hold meeting on eve of lok sabha poll counting
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची बैठक
reasons given by Congress leaders for ignoring pm narendra modis statement about Gandhi
गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
Modi attacks congress in himachal pradesh
मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?
rahul gandhi
“एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला!

‘आता घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार?’ किरीट सोमय्या म्हणाले, “ही तडजोड…”

व्हायरल व्हिडीओमध्ये काय घडले?

कागल येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सोमवारी रात्री सभा पार पडली. यावेळी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, भाजपा नेते अखिलेशसिंह घाटगे आणि त्यांच्या बहीण शौमिका महाडिक उपस्थित होत्या. शौमिका यांनी भाषण करत असताना हा देश नरेंद्र मोदींच्या हातात देणार आहात की राहुल गांधी यांच्या हातात देणार आहात? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. यावरून जनतेमधून कुणीतरी राहुल गांधी यांचे नाव घेतले.

भर सभेत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव घेतल्यामुळे त्याक्षणी काय उत्तर द्यावे? याचे भान कुणालाच राहिले नाही.काही सेकंदाचे मौन बाळगल्यानंतर भाषण करणाऱ्या शौमिका महाडिक यांनाही हसू आवरेना झाले. तसेच मंचावर बसलेले हसन मुश्रीफही खळखळून हसताना दिसले.

‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…

काँग्रेस पक्षाकडून आता हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. “सभा भाजपाची, पण चाहते राहुल गांधींचे”, असे कॅप्शन लिहून सदर व्हिडीओ काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काँग्रेसच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

प्रतीक पाटील नामक एक्स अकाऊंटवरूनही हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “भाजपाचे नेते विचारताय की तुम्ही मोदींच्या हातात देश देणार आहात की राहुल गांधींच्या? जनतेतून उत्तर येत आहे राहुल गांधी. भाजपा नेत्यांचे भाषण देणे पण अवघड झाल आहे”, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.