करोनामुळे देशावरचं संकट हे दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. करोनाचा प्रादुर्भाव हा जगभरातल्या देशांमध्ये झाला आहे. भारतात २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात लॉकडाउनही जाहीर करण्यात आला आहे. जगभराचा विचार केला तर इटलीची परिस्थिती भयंकर आहे. भारतात इटलीएवढी गंभीर स्थिती नसली तरीही ती गडद होत चालली आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता बर्वेने प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांच्या पत्राच्या मराठी अनुवादाचे वाचन केले आहे. हा व्हिडीओ पाहून आपण काळजीत पडतो, आपल्या जिवाचा थरकाप उडतो.

प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटलीतील रोम शहरात अडकून पडल्या आहेत. त्यांनी एक खुलं पत्र युरोपियन देशांना उद्देशून लिहिलं आहे. From your Future असं या पत्राचं शीर्षक आहे. या पत्राचा मराठी अनुवाद लेखिकेची परवानगी घेऊन करण्यात आला आहे. मिलेनिअल मराठीने यासंदर्भातला व्हिडीओ प्रकाशित केला आहे. मुक्ता बर्वेने या मराठी पत्राचं वाचन केलं आहे. तर अभिनेते उदय सबनीस यांची या व्हिडीओला प्रस्तावना आहे.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
ग्रामविकासाची कहाणी

काय म्हटलं आहे पत्रात?

“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे.. आम्ही तसंच वागलो जसं आत्ता तुम्ही वागता आहात. आमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेले आणि न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत जसे आमच्याकडे होते. एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणारे लोक.. आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे त्यात एवढी काय काळजी करण्याचं कारण असा प्रश्न विचारणारेही आहेत. पण लवकरच हे ही वाद मागे पडतील. तुम्ही रोज घरी छान जेवाल, कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काहीच नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा? यासाठी तुम्ही इंटरनेटवरुन मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या आणि आवडीनिवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही भाग व्हाल.सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही..अनेक वर्षे तुमच्या कपाटात धूळ खात पडलेली पुस्तकं तुम्ही वाचायला घ्याल. पण त्यातही तुमचं मन फार काळ रमणार नाही. तुम्ही पुन्हा जेवाल पण यावेळेस तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या देशाचं त्यातल्या लोकांचं काय होणार? हा प्रश्न तुम्हाला पडेल…

पाहा व्हिडीओ

असा काहीसा मजकूर असलेलं एक पत्र  फ्रान्सेसका मेलँड्री यांनी युरोपवासीयांना उद्देशून लिहिलं आहे. या पत्राचा मराठी अनुवाद लेखिकेच्या संमतीनेच करण्यात आला आहे. हे पत्र मुक्ता बर्वेच्या आवाजात ऐकताना आपल्या मनाला एक अनामिक भीती छेदून जाईल एवढं मात्र नक्की.