अभिनेता रितेश देशमुखने गोड बातमी दिली आहे. देशमुख कुटुंबियांमध्ये एका ‘लयभारी’ सदस्याची एण्ट्री झाली आहे. रितेश आणि जेनेलिया या दाम्पत्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ही गोड बातमी खुद्द रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

बाळाची चाहूल लागल्यापासून रितेश जेनेलियाची काळजी घेत होता. सलमानची बहिण अर्पिताच्या रिसेप्शनला देखील हे ‘लयभारी’ दाम्पत्य उपस्थित होते. त्यावेळी रितेश जेनेलियाची खास काळजी घेताना दिसून आला होता.