कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. खास म्हणजे मालिकेतील शिवादादा म्हणजेच अशोक फळदेसाईचा रांगडा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. अशोकची पिळदार शरीरयष्टी, भेदक नजर, भारदस्त बांधा आणि संवादफेक प्रेक्षकांना आवडत आहे. पण, यामागे बरीच मेहनत देखील आहे. याचबरोबर कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून दिसणारा अशोक मालिकेत तिथली बोलीभाषा अगदी सहज बोलतो, परंतु तो मुळचा कोल्हापूरचा नसून गोव्याचा आहे आणि कोल्हापूरी भाषेचा ठसका यावा म्हणून त्याने भाषेवर बरीच मेहनत घेतली आहे.

या मालिकेसाठी त्याला वजन वाढवावं लागलं होतं. फिट राहण्यामागचं सिक्रेट अशोकने प्रेक्षकांना सांगितले आहे.

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

१) तुझा दिनक्रम कसा असतो ? तुझ्या व्यायाम आणि डाएटबद्दल काही सांगशील का?

रोज आमचं शुटींग सुरु असतं. आऊटडोर शूट असतं आणि त्यामध्ये बऱ्याचदा थकवा येतो. पण, रोज जर ताजंतवानं दिसायचं असेल तर तुमचं आरोग्य उत्तम राखणे महत्वाचे असते आणि त्यासाठी महत्वाची असते झोप आणि हाच माझा मंत्र आहे जो मला फ्रेश ठवतो. डाएटदेखिल तितकेच महत्वाचे आहे. माझा आहार मी स्वत: घेऊन सेटवर जातो. माझा भर सध्या माझ्या भूमिकेवर आहे, त्याला लागणाऱ्या गोष्टी मला आत्मसात कराव्या लागतात ज्यासाठी मी अजूनही मेहनत घेत आहे. सकाळी मी सेटवर गेल्यावर माझ्यासाठी ५ मिनिटं काढून ठेवली आहेत. मी एकांतात बसतो आणि काही आवाजाचे व्यायाम करतो. कारण मी जेव्हा ललित कला केंद्रात होतो तेव्हा हे क्लासेस नियमित व्हायचे.

२) तुझा आहार कसा असतो?

उत्तर : माझा आहार मी घेऊन येतो आणि अगदीच सकाळची शिफ्ट असेल तर सेटवर त्या गोष्टी दिल्या जातात. मी सकाळी उकडलेली अंडी खातो. चिकन, केळी, सफरचंद, चिकू खातो. जास्त तेलकट, तिखट खात नाही, साखर कमी खतो मला गोड खूप आवडतं पण काही पथ्य पाळावी लागतात. मी रोज ५ लिटर पाणी तरी पितो. जीव झाला येडापिसा मालिका सुरु झाल्यापसून मी खूप जपतो स्वत:ला. या घेतलेल्या काळजीने मला ५ महिन्यांपासून ताप, सर्दी, खोकला झालेला नाहीये. त्यामुळे मी शारीरिक आणि मानसिकरित्या फिट आहे.

३) व्यायाम कधी आणि कसा करतोस?

उत्तर: मी सकाळी ५ वाजतो उठतो एक सव्वा तास वर्कआऊट असतं. नियमित व्यायाम करणं आणि ते नाही झालं तर मला खूप अस्वस्थ वाटतं. कधी कधी शुटींग लवकर असेल तर मी शूटिंगदरम्यान फावल्या वेळेत व्यायाम करतो. कारण एक दिवस जेवलो नाही तर कसं वाटतं तसं मला चुकल्यासारखं वाटतं. जिम जवळ असल्याने सगळं व्यवस्थित होतं. अभिनेता हृतिक रोशन माझा आदर्श आहे. त्याच्या शरीराची ठेवण आणि फिटनेस मला आवडते, त्याने घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. त्याला मी माझा गुरु मानतो.