बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. कंगनाने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण नुकतीच Levi’s Jeans या अमेरीकन जीन्स कंपनीची ग्लोबल ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. या ब्रॅंडच्या जाहिरातीचा दीपिकाने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. हे पाहताच कंगनाने तिच्यावर टिका केली आहे. मात्र, दीपिकाला ट्रोल होताना पाहताच नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केले आहे.

कंगनाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने दीपिकाला टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये तीन महिला आहेत. हा फोटो १८८५ चा असल्याचे त्यात म्हटले आहे. या तीनही महिला त्यांच्या त्यांच्या देशातल्या पहिल्या डॉक्टर असल्याचे हे सांगण्यात येत आहे. तर त्यात एक महिला ही भारत, दुसरी महिला जपान, तर तिसरी महिला ही सीरियाची आहे. या तीनही महिलांनी त्यांचा पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. “एक ट्विट या महिलांसाठी ज्यांनी फक्त त्यांच व्यक्तिमत्तवच नाही तर संपुर्ण सभ्यता, संस्कृती आणि राष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. आजच्या जगात अशा महिलांचे फोटो काढले, तर त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्यांसारखे ब्लाउज परिधान करतात. या महिला अमेरिकेचे मार्केटिंग करण्यापलिकडे काहीही करत नाही.” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाचे हे ट्विट पाहताच नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कंगनाचा एक फोटो शेअर केला आणि म्हणाला, “बरोबर मला माहित आहे?”, दुसरा म्हणाला, “न थांबणारा ढोंगीपणा”. तिसरा म्हणाला की, “तुला दीपिकाची इर्शा होते. लिवाइस ब्रॅंडची भीक मागतं आहेस का? तुझ्या माहितीसाठी ती खूप हॉट आहे.”