नाटक.. हा एक शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर येते ती तिकिटांची खिडकी, पडदा, तिसरी घंटा, रंगदेवता, नाट्यरसिक आणि ते दोन ते तीन तासांचे निख्खळ मनोरंजन. कधी खळखळून हसवणारं तर कधी आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं.. अशाच या रंगभूमीची पूजा करणारे हे अनेक आहेत. जेवढं ते या रंगभूमीसाठी करतात तेवढीच रंगभूमीही त्यांना नेहमीच भरभरुन देत असते. आपल्या अशाच एका रंगभूमीवरच्या अनूभवाबद्दल सांगतेय लेखिका, अभिनेत्री श्वेता पेंडसे..

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत मी विभावरीची जी व्यक्तिरेखा साकारत आहे त्याहून पूर्णपणे वेगळी भूमिका माझी आईचं पत्र हरवलं या नाटकात आहे. एक आव्हानात्मक भूमिका म्हणून याकडे पाहते. याशिवाय विभावरी ही मालिकेतली व्यक्तिरेखा लोकांना इतकी आवडते की जेव्हा ते हे नाटक पाहायला येतात त्यांना विभावरी कुठेच दिसत नाही. हे नाटक मीच लिहिलं आहे, त्यामुळे लिहिण्यामध्येही वेगळी आव्हानं होती. हा एक दिर्घांक होता. दिर्घांकेचं जेव्हा आपण दोन अंकी नाटकात रुपांतर करतो तरी त्यात पाणी टाकून वाढवलंय असं वाटायला नको.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

आईचं पत्र हरवलं या नाटकाच्या दरम्यान मला खूप छान अनूभव आले आणि अजूनही येत आहेत. ज्यांची नाटकं बघून मी मोठी झाले त्यांच्याकडून मिळालेली शाब्बासकी खूप काही सांगून जाणारी होती. जयंत घाटे एका प्रयोगाला आले होते. सामान्य प्रेक्षकांची दाद तर नेहमीच मिळते पण जयंत घाटे यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी खास होते. नाटक संपल्यावर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तुझ्या नाटकाचं नाव आईचं पत्र हरवलं असं आहे, पण माझ्या खिशातले आईचं पत्र हरवलंचं हे तिकीट मी कधीच हरवू देणार नाही. हे तिकीट माझ्यासोबत आता नेहमीच असेल. ही माझ्यासाठी फार मोठी पावती होती.

माझ्यासाठी नाटक ही एक साधना आहे. खरे तर मुंबईत आल्यानंतर माझा कॅमेऱ्याशी संबंध आला. नागपुरात असेपर्यंत माझा कॅमेऱ्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळेच जवळ जवळ १५ वर्ष मी फक्त रंगभूमीच करु शकले. कारण नागपुरात तेच होते. त्यामुळे रंगभूमीनेच मला घडवलं असं मी ठामपणे म्हणेन. त्या रंगभूमीवच पडले, धडपडले परत उभे राहीले. त्यामुळेच रंगभूमी ही एक साधना आहे असेच मला वाटते. कारण प्रत्येक साधनेनंतर जी प्राप्ती होते त्या प्राप्तीपर्यंत नेणारा हा प्रवास आहे त्यामुळे इथे शेवट नाहीच, इथे फक्त सतत पुढे जाणे आहे.

पडद्यावर काम करताना एखादा सिनेमा हिट झाला तर तुम्ही एका रात्रीत स्टार होऊन जातात. पण रंगभूमीची खासियतच ही आहे की तुम्हाला प्रत्येक प्रयोगाला स्वतःला सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक कलाकार हा त्या प्रवाहात असतो आणि सतत प्रवाहात असल्यामुळेच आपण प्रगती करु शकतो.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com