लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
thieves broke into a locked house at Karad and stole gold ornaments from the house
घरफोडीत तब्बल ११० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकडही लांबवली
cidco mahagruhnirman yojana received good response with 68000 application submitted
सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस 
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?

मार्चमध्ये संपुष्टात आलेले आर्थिक वर्ष आणि १ एप्रिलपासून लागू झालेले रेडीरेकनरचे नवीन दर यामुळे दरवर्षी मार्चमध्ये घरविक्रीत वाढ होते. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती. मार्च २०२१ मध्ये १७ हजार ७२८ घरे विकली गेली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता.

आणखी वाचा-मुंबई : ‘मेट्रो वन’कडे ४६१ कोटींचा थकीत मालमत्ता कर

२०२२, २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र असे असले तरी २०२४ मधील ही आतापर्यंतची सर्वाधिक घरविक्री आहे. जानेवारीत १० हजार ९९७, तर फेब्रुवारीत १२ हजार ५५ घरे विकली गेली होती. मार्चमध्ये मात्र यात वाढ होऊन घरविक्रीच्या संख्येने १४ हजारांचा पल्ला पार केला. पण आता एप्रिलमध्ये यात काहीशी घट झाली असून एप्रिलमध्ये ११ हजार ६० घरांची विक्री झाली आहे.