मातृत्वाचा क्षण हा जगभरातील कोणत्याही स्त्रीसाठी अतीव आनंदाचा क्षण असतो. सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत. हाच आनंदाचा क्षण सध्या हॉलीवूडची हॉट सेलिब्रिटी काइली जेनर अनुभवते आहे. या २०वर्षीय अभिनेत्रीने ट्विटरवरून आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली. गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या आणि ट्रॅव्हिस स्कॉट यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत माध्यमांतून चर्चा रंगल्या होत्या. काइली गर्भवती असल्याच्या बातमीमुळे त्या केवळ अफवा नसून त्यात तथ्य होते हे आता सिद्ध झाले आहे. ट्रॅव्हिस यानेही आपला आनंद ट्विटरवरून व्यक्त केला आहे. एकंदरीत या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचा वर्षांव होत असल्याचे दिसून येत असले तरी हा आनंद किती काळ टिकेल याबाबत शंका आहे. कारण गोड पदार्थात मिठाचा खडा पडावा त्या प्रमाणे या घटनेतही एक ट्विस्ट आला आहे. काइलीचा आधीचा प्रियकर टायगा याने थेट तिच्या चारित्र्यावरच संशय घेतला आहे. ती आई होणार आहे, ही बाब कितीही आनंदाची असली तरी तिच्या गर्भातील बाळ ट्रॅव्हिसचे नसून माझे आहे, असा दावा टायगाने केला आहे. तसेच हे सिद्ध करण्यासाठी त्याने काइलीकडे डीएनए चाचणी करण्याची मागणीही केली आहे.हा सगळा प्रकार प्रेक्षकांना अवाक करणारा असला तरी कायलीच्या आईला याने फार काही फरक पडलेला नाही. तिच्या मते ते मूल कोणाचे आहे यापेक्षा ती गर्भवती आहे ही बाब जास्त महत्त्वाची आहे. आई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद असतो. त्यामुळे होणाऱ्या बाळाचे वडील नक्की कोण, यासारखे वायफळ प्रश्न विचारून तिला तिच्या मुलीला दुखावण्याची इच्छा नाही. काइली जेनरने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नसली तरी चाहते मात्र तिचे मत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.

 

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?