– शर्वरी जोशी

दशावतारी नाटक… तळकोकणातील एक कलाप्रकार. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या या नाटकाची कोकणात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे तुळशीचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक कोकणवासियांना वेध लागतात ते गावच्या जत्रेचे आणि त्यात होणाऱ्या दशावतारी नाटकाचे. तुळशीचं लग्न झाल्यावर अनेक गावागावंमध्ये जत्रा भरवली जाते आणि या जत्रांमध्ये आवर्जुन समावेश असतो तो दशावतारी नाटकांचा. पौराणिक कथांचं उत्तमरित्या सादरीकरण या कलाप्रकारात केलं जातं. तुळशीच्या लग्नानंतर सुरु झालेल्या या नाटकांचा प्रवास साधारणपणे पावसाळ्यापर्यंत असतो. मात्र यंदा करोना विषाणूचं सावट या दशावतारी नाटकांवरही घोंघावल्याचं दिसून आलं. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे दशावतारी नाटक कंपन्यांवर आणि त्याच्यात काम करणाऱ्या कलाकारांवर आर्थिक संकट कोसळलं आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

आपली कोकणी संस्कृती जपण्यासाठी आणि लालमातीशी असलेलं नातं आणखी घट्ट करण्यासाठी कोकणातली हौशी कलाकार मंडळी आवर्जुन दशावतारी नाटकांमध्ये सहभाग घेतात. गावोगावी जाऊन नाटकांचे प्रयोग करतात. विशेष म्हणजे गावपाड्यात लोकप्रिय ठरलेला हा कलाप्रकार सातासमुद्रापार पोहोचला आहे. मुंबईमध्येही अनेक ठिकाणी दिवाळीनंतर भरणाऱ्या मालवणी महोत्सवांमध्ये विविध दशावतारी कंपन्यांना आमंत्रित केलं जातं. मात्र यंदा या दशावतार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे दशावतारी कलाकारांच्या उपजीविकेचं साधन बंद झालं आहे. गावात जत्रा नाहीत, त्यामुळे नाटकंही नाही. परिणामी या कलाकारांना आर्थिक संकटांना समोरं जावं लागत आहे. परंतु या कलाकारांच्या मदतीसाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

दशावतारासाठी तरुणांचा पुढाकार
लॉकडाउनचा फटका सर्व क्षेत्रांप्रमाणेच कलाविश्वालादेखील बसल्यामुळे अनेक चित्रपट, मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्याप्रमाणेच दशावतारी नाटकदेखील आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झालं आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना फूल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करता यावी. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटावा यासाठी ‘आई प्रतिष्ठान’ आणि ‘द इव्हेंट ब्लास्टर’ यांनी संयुक्तरित्या ‘पेटारो दशावताराचो’ ही नवीन सेगमेंट सुरु केली आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गंत युट्युबवर काही निवड दशावतारी नाटकं प्रदर्शित होणार आहेत. त्याअंतर्गत काही आर्थिक निधी गोळा करुन तो दशावतारी कलाकार मंडळींपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

अशाप्रकारे करणार मदत

“येत्या १५ जूनपासून युट्यूबवर ‘पेटारो दशावताराचो’ या अंतर्गत काही निवड दशावतारी नाटकं प्रदर्शित केली जाणार आहेत. सोबतच या दशावतारी मंडळींना मदतीचा हात मिळावा यासाठी नाटकाच्या आयोजकांनी प्रेक्षकांना मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी या नाटकाच्या युट्युब पेजसोबतच ‘गुगल पे’चा क्युआर कोड दिला आहे. ज्या प्रेक्षकांना या कालाकार मंडळींना मदत करण्याची इच्छा आहे, त्यांना ‘गुगल पे’च्या माध्यमातून आर्थिक मदत करता येणार आहे असं”, कलादिग्दर्शक रुपेश नेवगी यांनी सांगितलं.

‘पेटारो दशावताराचो’ या कंपनीच्या खात्यात जमा झालेली रक्कम नाटकातील कलाकार तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य दशावतारी कलाकारांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ४,५०० दशावतार कलाकार मंडळी असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या मंडळींपर्यंत शक्य तितकी मदत समसमान प्रमाणात पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे या नाटकातील सर्व कलाकारांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करुन या नाटकांचं चित्रीकरण केलं आहे.

‘पेटारो दशावताराचो’मध्ये पाहता येणार ही नाटकं

१५ जून – चौरंगीनाथ
१६ जून – सती सुलोचना
१७ जून – तीन नारायण भोजन
१८ जून – श्रीयाळ चांगुणा
१९ जून – कृष्णजन्म