Viral Video: भविष्यात चांगल्या सोयी व सुखसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जण वर्तमानात खूप कष्ट करतो. त्यामुळे निवृत्तीनंतर (रिटायरमेंट) अनेक जण आनंदात जीवन घालवतात आणि पूर्ण वेळ कुटुंबासाठी व खासकरून आपल्या जोडीदारास देतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका निवृत्त जोडप्याने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट चालू केलं आहे. तसेच निवृत्तीचा काळ आनंदात घालवण्यासाठी ते एका रोड ट्रीपवर निघाले आहेत. चला जाणून घेऊ या खास जोडप्याबद्दल.

रोड ट्रीपला जाणे हे अनेक प्रवाशांचे स्वप्न आहे. तर हेच स्वप्न एक निवृत्त जोडपं जगत आहे आणि ते त्यांचा प्रवास सोशल मीडियाद्वारे इतरांसोबत शेअर करीत आहेत. या जोडप्याने जानेवारीमध्ये दिल्ली ते कन्याकुमारी असा ५२ दिवसांचा प्रवास सुरू केला होता. रोड ट्रीपसाठी त्यांना एक व्हॅन मिळाली, ज्यामध्ये लहान स्वयंपाकघर (होम ऑन व्हील्स) आहे. जोडप्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते गाडीत जेवण बनवतानासुद्धा दिसले आहेत. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: ही दोस्ती तुटायची न्हाय! भेटा ५५ वर्षांपासून एकाच कॅम्पमध्ये राहणाऱ्या हत्ती मित्रांना; IAS अधिकाऱ्यांनी सांगितली गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

अलीकडेच त्यांच्या या इन्स्टाग्राम व्हिडीओला १५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हे जोडपे जेवण्यासाठी औरंगाबाद हायवेच्या बाजूला एका चिंचेच्या झाडाखाली थांबले आहेत आणि जेवणात काय खास बनवलं आहे हे सांगत आम्ही आमचे आनंदी जीवन जगत आहोत; असे सांगतानाही दिसून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही या जोडप्याचा प्रवास @retiredpunjabi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पाहू शकता. नेटकरी या निवृत्त जोडप्याला रोड ट्रिपला जाताना आणि त्यांच्या छंदांना प्राधान्य देताना पाहून कमेंटमध्ये आनंद व्यक्त करत आहेत. पन्नाशीत गेल्यानंतरही आपले जीवन आनंदाने कसं जगायचं हे या निवृत्त जोडप्याने जणू काही उदाहरण दाखवलं आहे.