पाच नाही सहा अनोळखी व्यक्ती, त्यांचे एकाच क्रूझवर एकत्र येणे आणि तीन देशांमधली भ्रमंती असं सगळं भव्यदिव्य समोर घेऊन आलेला वन वे तिकीट चित्रपट हा चकवा आहे. आपण एकाच जागेवर बसून दोन तास पडद्यावरच्या कलाकारांबरोबर किती गोल गोल फिरतो. पण त्यानंतरही आपण बसल्या जागीच असतो. पाँड्सचे ड्रीमफ्लॉवर जेवढी ताजगी देते तेवढीही ताजगी हा चित्रपट देत नाही.

रहस्यमय कथेतलं रहस्य एक तर प्रेक्षकांना कळू नये किंवा कळत असलं तरी त्या रहस्याने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवावं असा काहीसा मापदंड असतो असं म्हणतात. पण चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला सहाव्या माणसाचं रहस्य कळलेलं असतं जरी ते प्रोमोपासून लपवून ठेवलेलं असलं तरी.. तर परदेशात नोकरीच्या आमिषाने येऊन पोहोचलेला अनिकेत (शशांक केतकर). गावची जमीन आणि आईचे दागिने विकून तिथवर पोहोचलेल्या अनिकेतला त्या नावाची कुठलीच कंपनी नसते हे कळतं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. परदेशात फसलेल्या अनिकेतला त्याच रात्री एका गोळीबाराच्या घटनेत कोणा एका आदित्य राणेचा (गश्मीर महाजनी) पासपोर्ट, त्याचे पसे आणि क्रूझचं तिकीट सापडतं. मायदेशात परतण्यासाठी हा एकमेव धोकादायक पर्याय स्वीकारून अनिकेत क्रूझवर पोहोचतो. तिथे त्याची ओळख परदेशात क्रूझवर येतानाही पर्समध्ये आठवणीने पाँड्स ड्रीमफ्लॉवर टाल्कम पावडरचा छोटा डबा ठेवून वावरणारी आदित्यची प्रेयसी अमृता खानविलकर भेटते. तिथे समर राज नावाचा ब्लॉगर (सचित पाटील) आणि त्याची साहाय्यक (नेहा महाजन) असे सगळे एकत्र एकमेकांना भेटतात. त्यातून पुढचा रहस्यमय प्रवास घडतो. समर राज आणि त्याची साहाय्यक रेसमधील अनिल कपूर आणि समीरा रेड्डी जोडीची आठवण करून देतात. मात्र समरच्या तोंडी पदोपदी येणाऱ्या शायरीने लोकांची मने रिझवण्याऐवजी उचकवण्याचा प्रयत्न जास्त केला आहे.

Allu Arjun, Rashmika Mandanna starr Pushpa 2 second song Angaaron Out
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
anagha atul dance on ruki sukhi roti
हुबेहूब राणी मुखर्जी! २३ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर अनघा अतुलचा जबरदस्त डान्स; रिक्रिएट केला ‘नायक’ चित्रपटाचा लूक
Blockbuster south movies
आधी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, नंतर ओटीटी रिलीजसाठी घेतले कोट्यवधी; तुम्ही पाहिलेत का ‘हे’ बॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपट
Kartik Aaryan chandu champion first look poster out
कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहून नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
bhaiyya Ji is manoj bajpayee 100th film
‘भैय्याजी’ आहे तरी कोण? मनोज बाजपेयींच्या १०० व्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! बिहारमध्ये होणार जबरदस्त अ‍ॅक्शन

चित्रपटाच्या कथेतच इतक्या चुका आहेत की पहिल्या फ्रेमपासूनच आपण शंकाग्रस्त होतो, विशेषत: अनिकेतचे आदित्यच्या पासपोर्टवर क्रूझवर सहजी शिरणे पटत नाही. आदित्य हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, याच्या बातम्या मोठमोठय़ाने क्रूझवर सुरू असतात. मात्र क्रूझवर या नावाचा प्रवासी आहे याची साधी दखलही क्रूझ व्यवस्थापन घेत नाही. रहस्यमय कथेला आदित्यच्या रूपाने देहविक्री रॅकेटची समस्याही ठिगळासारखी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गाणी तर इतक्या वेगाने येऊन आदळतात.. शशांक केतकर आणि अमृतावर चित्रित झालेले रेशमी रेशमी हे गाणे श्रवणीय झाले आहे. अनिकेतची भूमिका शशांकसाठी चपखल असल्याने त्याने अगदी प्रामाणिकपणे आणि अचूकपणे ती साकारली आहे. गश्मीरने धोका पत्करून ही वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्या विक्षिप्त वागण्यामागचे कारणच कथेत नसल्याने त्याचा परिणामही कमी होतो. अमृता, नेहा आणि सचितच्या भूमिकेलाही खूप मर्यादा आहेत. रहस्यपटापेक्षाही पाँड्सची जाहिरात ही या चित्रपटाचे एक वैशिष्टय़ ठरू शकते. खूप अपेक्षा असलेला हा चित्रपट घोर निराशा करतो.

वन वे तिकीट

दिग्दर्शक अमोल शेटगे

कलाकार शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, अमृता खानविलकर, नेहा महाजन