महाराष्ट्राला पोट धरुन हसवणाऱ्या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद अतिशय चलाखीने सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. रोजच्या व्यापातून प्रेक्षकांना थोडासा आराम मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या कठीण काळात हास्यजत्रा हि टेन्शनवरची मात्रा ठरत आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने करोना लस घेतली आहे.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांनी मालाड येथील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये करोनाची लस घेतली. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना लस देण्यात आली आहे.

Western Maharashtra Status and Direction of Co operative Movement Maharashtra Day 2024
पश्चिम महाराष्ट्र: सहकार चळवळ दशा आणि दिशा
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि त्यांना हसवत आहेत. सध्याच्या कठीण काळात हास्यजत्रा हि टेन्शनवरची मात्रा ठरत आहे. कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लस घेतल्याचे सांगितले आहे. विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर लस घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.