‘देऊळबंद’ चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी. आपला अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा गश्मीर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या गश्मीरच्या अशाच एका हटके लूकची चर्चा होत आहे. त्याच्या एका चाहत्याने एक्स (ट्विटर) पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या या जबरदस्त फोटोशूटाला “मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये चाहत्याकडून गश्मीरचा उल्लेख ‘सुपरस्टार’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे गश्मीरने ही पोस्ट रिशेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना खास सल्ला देत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : “वऱ्हाड निघालं…”, पूजा सावंत पाठोपाठ तितीक्षा तावडेची लगीनघाई, समोर आले मेहंदी सोहळ्याचे फोटो

“प्लीज सुपरस्टार बोलू नका…अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की…सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात… नक्की होणार… माझं वचन आहे. पण आता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणू नका.” अशी पोस्ट गश्मीरने शेअर केली आहे.

हेही वाचा : पुण्याची तरुणाई ड्रग्जच्या आहारी? ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्याने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ; म्हणाले, “त्या मुली बेशुद्ध…”

गश्मीरने शेअर केलेल्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्याचे चाहते लवकरच त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor gashmeer mahajani shares post about superstar in marathi industry sva 00
First published on: 25-02-2024 at 14:58 IST