मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा सावंतच्या नुकत्याच पार पडलेल्या संगीत सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आता पूजा पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश-क्षितिजा, शिवानी-अजिंक्य या लोकप्रिय जोडप्यांपाठोपाठ आता लवकरच मालिका विश्वातील प्रसिद्ध जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहे.

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी ८ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांनी या दोघांचं केळवण मोठ्या उत्साहात केलं होतं. आता लवकरच ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा : पुण्याची तरुणाई ड्रग्जच्या आहारी? ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्याने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ; म्हणाले, “त्या मुली बेशुद्ध…”

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला मालिकाविश्वातील बरेच कलाकार उपस्थिती लावणार आहे. अनघा अतुल, ऋतुजा बागवे यांनी खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनघाने “वऱ्हाड निघालं बरं का!” अशी स्टोरी शेअर करत तितीक्षा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहे. याशिवाय स्वत: तितीक्षाने मेहंदी सोहळ्याची खास झलक तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : पूजा सावंतच्या संगीत सोहळ्याला पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार, बहिणीने शेअर केला Inside व्हिडीओ

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या दोघांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नसली तरीही सध्याची लगीनघाई पाहता येत्या दोन ते दिवस हे जोडपं लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

अनघा अतुलने शेअर केली स्टोरी
तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, सिद्धार्थ आणि तितीक्षाने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तितीक्षाला मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.