मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी सोनालीने एक मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडेकर असल्याचं सर्वांनाचं माहित आहे. तसंच तो दुबईत राहतो हे देखील सर्वश्रृत आहे. पण कुणाल नेमकं काय काम करतो? हे कोणालाच माहित नव्हतं. अखेर याचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला आहे.

हेही वाचा – Video: लग्न मंडपातील प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकरच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने तिचा नवरा काय काम करतो? याचा खुलासा केला. सोनाली म्हणाली, “तो पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातला आहे. तो लॉस अ‍ॅडजस्टर आहे. म्हणजे तो कंपन्यांचा तोटा शोधून काढतो. बँकेत किंवा कंपनीत अनेक मोठे-मोठे तोटे होतात, त्यासाठी तो काम करतो. जेव्हा एखाद्याच्या बँकेत फ्रॉड होतो तेव्हा ते इन्सुरन्स कंपनीकडे जातात. मग इन्शुरन्स कंपनी तोटा शोधण्यासाठी यांच्या एजन्सीकडे जाते.”

हेही वाचा – शुभमंगल सावधान! अखेर प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

पुढे सोनाली म्हणाली, “कुणाल सध्या दुबईत राहतो. तो मूळचा यूकेचा आहे. त्याला माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी एका सिनेसृष्टीचा भाग आहे हे देखील त्याला माहित नव्हतं. आजही तो या क्षेत्रापासून दूरच आहे. पण तो माझ्या कामाचं नेहमी कौतुक करतो आणि मला पाठिंबा देत असतो. बाकी इथे काय चाललंय? माझ्याबद्दल काय अफवा आहेत? याकडे तो अजिबात लक्ष देत नाही.”