तरुणाईचा फिटनेस आदर्श म्हणून अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहिलं जातं. फिटनेसचं वेड असलेला मिलिंद फिटनेस फ्रिक,आयर्न मॅन अशा विविध नावाने ओळखला जातो. मिलिंद त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत कायम सजग असून या लॉकडाउनच्या काळातही तो नियमित व्यायाम करताना दिसून येतो. विशेष म्हणजे या काळात तो विविध मार्गाने व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच त्याच्या पत्नीने अंकिता कोनवारने त्याचा व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

अंकिता बऱ्याच वेळ मिलिंदसोबतचे तिचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यात अनेक वेळा तिचे आणि मिलिंदचे वर्कआऊट करतानाचे फोटो असतात. यात अलिकडेच अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये मिलिंद पुशअप्स करताना दिसून येत आहे. मात्र या फोटोची अन्य एका कारणामुळे चर्चा होत आहे.


शेअर केलेल्या या फोटोमध्ये अंकिता, मिलिंदच्या पाठीवर बसली असून मिलिंद पुशअप्स करत आहे. यापूर्वी मिलिंदनेदेखील त्याचे व्यायाम, वर्क आऊट करतानाचे एअनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान, मिलिंदप्रमाणेच अंकितादेखील फिटनेस फ्रिक आणि फिटनेसप्रेमी असल्याचं दिसून येतं. बऱ्याच वेळा ती तिच्या एकटीचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. मिलिंद अलिकडे अमेझॉन प्राइमच्या ‘फोर मोर शॉट्स’ या सीरिजमध्ये झळकला होता.