प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाप्रमाणेच चाहत्यांकडून मिळणारं आणि त्यांचं प्रेमही तितकत महत्त्वाचं असतं. चाहत्यांची प्रत्येक प्रतिक्रिया त्यांचं मत हे जणू त्या कलाकाराच्या कामाची पोतपावतीच असते. चाहत्यांच्या याच प्रेमाचा अभिनेता राणा डग्गुबतीला एक अनोखाच प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानला दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं आणि त्याच्याप्रती अनेकांनी काळजी व्यक्त केली. इरफानच्या आजारपणाच्या चर्चा शमत नाहीत तोच अभिनेता राणा डग्गुबतीविषयीसुद्धा अशाच चर्चा पाहायला मिळाल्या.

राणाला किडनीचा आजार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या होत्या. इतकच नव्हे तर, किडनी प्रत्यारोपणासाठी तो अमेरिका किंवा सिंगापूरला जाऊन त्यावर उपचार घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं. या चर्चांना आणखी उधाण तेव्हा आलं, जेव्हा राणाची आईच त्याला किडनी देणार असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. पण, सुदैवाने या सर्व अफवा ठरल्या. खुद्द राणानेच ट्विट करत याविषयीची माहिती दिली.

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये खलनायकी भूमिका साकारत ‘भल्लालदेव’ ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या राणाने ट्विट करत आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘माझ्या प्रकृतीविषयी बऱ्याच गोष्टींच्या चर्चा मी ऐकल्या. मी अगदी बरा आहे, माझी प्रकृतीही उत्तम आहे. रक्तदाबाशी निगडीत थोडा त्रास असल्यामुळेच मी त्यावर उपचार घेत आहे. तुम्ही माझी काळजी करत आहात हे पाहून मला दिलासा मिळतोय. पण, मी एक विनंती करु इच्छितो की कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांना भरीस पडू नका. ही माझी प्रकृती आहे, तुमची नाही’, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. राणाने हे ट्विट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.