बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर कायम चर्चते असते. बॉलिवूडमधील अनेक सोहळ्यांमध्ये नव्या नंदा तिच्या ग्लॅमरस लूकने मीडियाचं लक्ष वेधून घेताना दिसली आहे. अलिकडे अनेक स्टार किडस् बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने नव्या नंदाच्या बॉलिवूड पदार्पणाकडे देखील चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र सध्यातरी नव्यानं बॉलिवूडला पाठ फिरवली आहे. नव्यानं वडिलोपार्जित व्यवसायासात करिअर करण्याचं ठरवलंय. नव्या नंदाच्या या निर्णयानं तिचे चाहते निराश झाले आहेत.

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकतच तिने इंडिया वोगला दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअर प्लॅनविषयी सांगितलं. बॉलिवूड किंवा इतर अन्य क्षेत्रात न जाता वडिलांच्या व्यवसायातच पुढे जाण्याचं नव्या स्पष्ट केलंय. नंदा कुटुंबाच्या चौथ्या पिढीत फॅमेली बिझनेस सांभाळणारी नव्या नंदा ही पहिला महिला असल्याचं तिने मुलाखतीत म्हंटलं. आजोबांच्या व्यवसायाचा वारसा पुढे नेण्यात आनंद होत असल्याचंही नव्या नंदा म्हणाली. मला महिला उद्योजक म्हणून काम करताना खुप आनंद होत आहे कारण अलिकडे बऱ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर असून ही अभिमानाची बाब असल्याची भावना नव्याने व्यक्त केलीय.

नव्याच्या या निर्णयाचं बिग बींनी कौतुक केलंय. तुझा आम्हाला अभिमान आहे असं म्हणत बिग बींनी नव्याचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

नव्या नंदानं अमेरिकेतील फोर्डहम यूनिर्वसिटीतून डिजिटल टेक्नॉलजीचं शिक्षण पूर्ण केलंय. तसचं नव्या नंदा महिलांसाठी काम करणाऱ्या आरा हेल्थ या कंपनीची को-फाउंडर आहे. काही दिवसांपूर्वीचं नव्या नंदानं ‘प्रोजेक्ट नवेली’ ची सुरुवात केली आहे. लैंगिक समानतेसाठी ही संस्था देशात कार्यरत आहे. नव्याच्या ‘प्रोजेक्ट नवेली’ मुळे ची चर्चेत आली होती.