बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अभिनयाची सगळेच प्रशंसा करतात. त्याच्या अभिनय कौशल्यासाठी तो आज बॉलीवूडमध्ये नावाजला जातो. त्याच्याबद्दलची एक गोष्ट जाणून तर तुम्ही त्याचे आणखी मोठे चाहते व्हाल. नवाजुद्दीनच्या दिलदारपणाचा एक किस्सा नुकताच समोर आला आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हरामखोर’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी याने मानधनात केवळ एक रुपया घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. याविषयी चित्रपटाच्या सह निर्माती असलेल्या गुनीत मोंगा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, नवाजुद्दीन आणि चित्रपटातील बाकी सदस्यांनी कमीत कमी तसेच काहींनी तर मानधन न घेताच काम केले आहे. नवाजुद्दीनला चित्रपटाची कथा खूप आवडली होती. चित्रपटाच्या बजेटमध्ये अडथळे येऊनही त्याने यात काम करण्याचा निर्णय घेतला. तो एक चांगला व्यक्ती असून त्याने चित्रपटाकरिता केवळ एक रुपया मानधन घेतले. त्याची मेहनत आणि पाठिंब्यामुळेच ‘हरामखोर’ चित्रपट पूर्ण होऊ शकला. गुनीत मोंगा आणि अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाची संयुक्त निर्मिती केली आहे.

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

‘हरामखोर’ चित्रपटाविषयी नवाजुद्दीन म्हणाला की, हा एक कमी बजेट असलेला चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट किती कमाई करणार याची आम्हाला जराही चिंता नाही. कारण चित्रपट आधीच नफ्यात आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचेल. चित्रपट छोट्या स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात येत असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करतो. ‘हरामखोर’ या चित्रपटाची कथा १४ वर्षीय मुलगी आणि तिच्या ट्युशन शिक्षकावर आधारित आहे. सदर चित्रपटातील मुलीची भूमिका ‘मसान’ मधील अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने साकारली आहे. तर तिच्या ट्युशन शिक्षकाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. गुजरातच्या एका छोट्या गावात या चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. १४ वर्षांची एक शाळकरी मुलगी (श्वेता त्रिपाठी) आणि तिचे शिक्षक (नवाजुद्दीन सिद्दीकी) यांच्या प्रेमकहाणीभोवती हा चित्रपट फिरतो. या चित्रपटातली दृश्ये हिच या चित्रपटाचा कणा असल्याचे म्हटले जात आहे. एक शिक्षक, आणि एक मुलगा या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम असते. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकारांमध्ये रंगलेली जुगलबंदी सुरेख दाखवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवात ‘मसान’ चित्रपटातील श्वेता त्रिपाठीच्या भूमिकेची बरीच प्रशंसा करण्यात आली होती. प्रेक्षकांनीही तिची भूमिका आवडली होती.