छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. लवकरच ‘बिग बॉस १५’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या घरात बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसची यंदाची थीम ‘स्टे कनेक्टेड’ आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे एकमेकांसोबत काही तरी कनेक्शन असणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे शोसाठी निर्माते बहिण आणि भावाची जोडी शोधत आहेत. म्हणून नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांना बिग बॉसची ऑफर देण्यात आली आहे. पण त्या दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : ‘तारक महेता…’मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉस १५च्या घरात?

टोनी कक्करची अनेक गाणी हिट ठरली आहेत. तर नेहा इंडियन आयडल १२मध्ये परीक्षक म्हणून काम करत होती. पण काही कारणास्तव ती गेल्या काही दिवसांपासून शोपासून लांब आहे. आता नेहाने बिग बॉससाठी इंडियन आयडल शो सोडला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या शोमध्ये नेहाच्या जागी परीक्षक म्हणून सोनू कक्कर दिसत आहे.

यापूर्वी बिग बॉस १५ मध्ये अभिनेता सुनील ग्रोवर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.