अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला राजकीय विषयावर आधारित चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्यांना पाहता आला नव्हता, ते आता ओटीटीवर हा सिनेमा पाहू शकतील.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. यावर आधारित असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता १९ एप्रिल पासून हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.

या चित्रपटात अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव अशी तगडी स्टारकास्ट होती.

अवघ्या २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व लेखन यामी गौतमचा पती आदित्य धर याने केलं होतं.