काही दिवसांपूर्वी ‘नो फिल्टर विथ नेहा’ या नेहा धुपियाच्या कार्यक्रमामध्ये रणवीरने बेस्ट किसर म्हणून दीपिका पदुकोणचे नाव घेतले होते. त्याचं हे वक्तव्य तेव्हा समोर आलं जेव्हा रणवीर आणि दीपिकामध्ये ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते. पण आता जणू त्याच्या या वक्तव्याचं स्पष्टीकरण देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये हे दोघं एकमेकांच्या फार जवळ आहेत.

…तर १४ वर्षांपूर्वीच बालिका वधूमध्ये दिसले असते रणबीर- आलिया

Loksatta kutuhal Architect of ChatGPT Sam Altman
कुतूहल: चॅटजीपीटीचे शिल्पकार – सॅम ऑल्टमन
why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
Mary Kom, Olympic, Olympic team captain,
विश्लेषण : मेरी कोमने ऑलिम्पिक पथकप्रमुखपद का सोडले?
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

रणवीर- दीपिकाचा हा फोटो ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केला. हा फोटो वोग मासिकासाठी करण्यात आलेल्या एका फोटोशूट दरम्यानचा असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण हा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यावर झपाट्याने व्हायरल व्हायला सुरूवात झाली. एवढंच काय तर दीपवीर या खास हॅशटॅगने त्यांचे चाहते सोशल मीडियावर या फोटोबाबत बोलत होते.

रणबीर कपूरसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर दीपिका नैराश्यग्रस्त झाली होती. तिच्या या काळात तिला कुटुंबाने जेवढी मदत केली तेवढीच मदत तिच्या मित्र-मैत्रिणींनीही केली. या मित्र परिवारातलं एक नाव होतं ते म्हणजे रणवीर सिंग. रणवीर तिच्या या कठीण काळात तिच्यासोबत ठाम उभा राहिला.

दीपिका आणि रणवीरची जोडी प्रेक्षक ऑनस्क्रिन जेवढी पसंत करतात तेवढीच किंबहूना त्याहून जास्त पसंत ऑफस्क्रिन करतात. या दोघांनी आतापर्यंत रामलीला आणि बाजीराव- मस्तानी या दोन सिनेमात एकत्र काम केले. तसेच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती सिनेमातही प्रेक्षकांना ही जोडी पाहता येणार आहे.

मात्र आता दोघांमधील हे गोड नाते संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. रणवीरला लग्न करायचे होते दीपिकाला मात्र तिच्या करिअरवर लक्ष द्यायचे असल्यामुळे तिला लग्नाची घाई करायची नव्हती. या एका कारणामुळे या दोघांचे मार्ग वेगळे झाले असे म्हटले जाते. याबाबत अजून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच निराशाजनक आहे. किमान सध्या हा फोटो पाहून या जोडप्याने पुन्हा एकत्र यावे, असेच त्यांना वाटत असेल यात काही शंका नाही.