दीपिका आणि रणवीर हे दोघंही बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं आहे. या दोघांच्या लग्नाला आता दोन महिने उलटले. या लग्नानंतर दीपिकाला तू आडनाव बदलणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर माझ्यापेक्षा रणवीरनं आडनाव बदलावं असं मिश्किल उत्तर तिनं दिलं होतं. दीपिकाच्या या मिश्किल उत्तरावर रणवीर पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. दीपिकासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या रणवीरनं आपलं आडनाव बदलायची तयारीही दर्शवली आहे.

नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत त्याला आडनाव बदलणार का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तरही रणवीरनं दीपिकाइतकंच मिश्किलपणे दिलं आहे. ‘मी स्वत:चं आडनाव लावत नाही तेव्हा दीपिकाचं आडनाव लावायला हरकत नाही आणि तसंही पादुकोन हे खूपच मोठं नाव आहे’ असं उत्तर त्यानं दिलं आहे. रणवीरनं हे उत्तर मिश्किलपणे दिलं असलं तरी एकप्रकारे बायकोच्या शब्दासाठी नावाही बदलायला तयार असल्याची तयारी त्यानं दर्शवली.

रणवीरनं आपलं आडनाव बदलावं असं दीपिका काही दिवसांपूर्वी म्हणाली होती खरं मात्र नंतर तिनं यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. रणवीरनं आपलं नाव कमावण्यासाठी खूपच मेहनत घेतली आहे त्यामुळे त्यानं किंवा मी आपलं आडनाव का बदलावं? मी ते फारच गमतीनं म्हणाले होते असं म्हणत तिनं आडनाव बदलायला एकप्रकारे नकार दिला होता.