‘स्कूबी डू’ हे आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्टूनपैकी एक म्हणून ओळखले जाते. या कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. केनचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची दुखद बातमी दिली. गेली काही वर्ष ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केन यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

अवश्य पाहा – तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

‘स्कूबी डू’ हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय कार्टून्स पैकी एक म्हणून ओळखले जाते. १९६९ साली केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीने या कार्टूनची निर्मिती केली होती. स्कूबी हा एक कुत्रा आहे. तो आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने विविध प्रकारच्या रहस्यांचा उलगडा करतो. हे कार्टून आपल्या जबरदस्त पटकथेमुळे लोकप्रिय झालं. स्कूबी डूच्या यशामागे केन यांचा सिंहाचा वाटा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी या कार्टूनवर काम केलं. ते एक उत्तम स्केच आर्टिस होते. स्कूबी डू सोबतच त्यांनी ‘पॉपाय द सेलर मॅन’, ‘टॉम अँड जेरी’, जॉनी ब्राव्हो यांसारख्या अनेक कल्ट क्लासिक कार्टूनसाठी क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. केन यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.