‘कबीर सिंग’नंतर अभिनेता शाहिद कपूर आणखी एका तेलुगू रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जर्सी’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या तयारीला त्याने सुरुवात केली. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारणार असून तो सध्या क्रिकेटविषयीचे बारकावे शिकत आहे. या प्रशिक्षणादरम्यानचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘जर्सीसाठी तयारी.. दे दना दन’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये शाहिदचा लूक हा ‘कबीर सिंग’ चित्रपटातील लूकसारखाच आहे. हातात ग्लोव्ह्ज आणि बॅट घेऊन शाहिद क्रिकेट खेळण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

#jersey prep. . . De dhana dhan

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.