घर हा प्रत्येक माणसाच्या जिव्हाळय़ाचा विषय. एखादी नवीन काही गोष्ट बनवायची असली तरी त्यासाठी लागेल ते काम करायला घरातील हरएक जण तुटून पडत असतो. असंच काहीसं जोशी परिवारातही घडतं. डेहराडून येथे वास्तव्यास असलेले सरला जोशी आणि उमेश जोशी हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह तिथे गेली पंचवीस वर्षे राहात असतात. इतक्या कालावधीनंतर त्यांनी पाहिलेलं स्वप्नातील घर बनवायचं असं ते ठरवतात. त्यातून त्यांना हे घर काही करून तीन महिन्यांच्या आतच तयार करायचे असते, कारण सरला जोशी या तीन महिन्यांनंतर निवृत्त होणार असतात.  हे चौकोनी कुटुंब घरासाठीची जमीन, मग त्यासाठी हवा असलेला कर्तबगार आर्किटेक्ट अशी अनेक माणसं गोळा करत जातात. तेव्हापासून ते घर तयार होईपर्यंत जे काही आनंदाचे क्षण, गमतीजमती आणि रुसवेफुगवे होतात त्यांचीच एक रंजक कथा ‘होम शांती’ या कौंटुबिक विनोदी वेबमालिकेतून पाहायला मिळणार आहे. पूर्णत: कौटुंबिक नाटय़ विषय असल्याने प्रौढ व्यक्तींना सरला आणि उमेश जोशी यांच्याकडे पाहून ऐंशीच्या दशकातील मालिकांमधील अशी लोकप्रिय कौंटुबिक जोडपी आठवल्याशिवाय राहणार नाही. दोन पिढय़ा शेवटी एकाच घरात राहणार असल्याने प्रत्येकाच्या घराबद्दलच्या नाना तऱ्हाही असतात. कुणाला अमुक एक गोष्ट इथे हवी असते तर तमूक एक गोष्ट तिथे हवी असते. त्यामुळे अशा विनोदी फेऱ्यांमध्ये ही वेबमालिका अडकलेली असली तरी घराची जमीन, कागदपत्रं, त्यावरून वकील आणि राजकारण्यांशी करावा लागणारा सामना अशा वास्तव मुद्दय़ांवरही यात भाष्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कहानी में ट्विस्ट या प्रकारे पुढे सरकणारी ही रंजक गोष्ट आहे. या मालिकेचं लेखन आणि दिग्दर्शन आकांक्षा दुवा यांनी केलं आहे.

कलाकार – मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, हॅप्पी रणजित, पूजा छाब्रा आणि अन्य  कधी – ६ मे  कुठे – डिन्से प्लस हॉटस्टार

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

‘द पेन्टॅवरेट’

काहीशी न समजणारी दुनिया तरीही आकर्षक वाटणारी, काहीशी न उमगणारी माणसं तरीही हसवणारी असं काहीसं द्वंद्व एखाद्या कथेतून समोर आलं की त्यातला विचित्रपणा जाऊन त्या कथेतील अनेक पैलूही रंजक वाटू लागतात. आणि प्रेक्षकांसाठी ती कलाकृती एक पर्वणीच ठरते. आगामी ‘द पेन्टॅवरेट’ ही हॉलीवूड वेबमालिका काहीशी अशा रंजक पठडीतील आहे असं म्हणता येईल. ज्येष्ठ अभिनेते माईक मायर्स यांनी २००० साली आलेल्या ‘श्रेक’ चित्रपटातील शीर्षकभूमिका गाजवली. ‘श्रेक’ चित्रपटमालिकेतील त्यांची भूमिका आणि त्यासाठी त्यांना मिळालेली ओळख पुसली जाणं शक्यच नाही. ते उत्तम लेखक, दिग्दर्शकही आहेत. तेव्हा त्यांच्याच कल्पनेतून तयार झालेली ‘द पेन्टॅवरेट’ ही वेबमालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३४७ साली जगात आलेली प्लेगची साथ ज्याला ‘ब्लॅक डेथ’ असेही म्हटले गेले. त्याच संदर्भापासून या कथेची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते. याचा अर्थ असा की तेव्हापासून काही गुप्त पाच मनुष्यांची जोडी या जगात वास्तवात आहे आणि याची चाहूल कनेडियन पत्रकार केन स्काबरेरोघ (माईक मायर्स) यांना लागते. तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा आणि वास्तव्याचा शोध घेण्यासाठी ते आणि त्यांचे साथीदार सज्ज होतात. तेव्हा या पाच जणांचा शोध घेताना मुळात काळाचा संदर्भ कथेतील वर्तमानाच्या हिशोबाने कोणता आहे? म्हणजेच नक्की ते साल कोणतं आहे?, याचाही उलगडा फारसा झालेला नसून कदाचित ‘द पेन्टॅवरेट’मध्ये रंगवलेली दुनिया ही भविष्यातलीही असू शकते असाही अंदाज बांधता येतो. तेव्हा या पाच जणांचा शोध घेताना काही अडचणी येणार का? की काही नव्या गोष्टी जगाच्या इतिहासाच्या पानावर उलगडल्या जातील?, याची विनोदी तसेच विचित्र अंगाने केलेली कथामांडणी ‘द पेन्टॅवरेट’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. माईक मायर्स यात प्रमुख आठ भूमिका करत असून ते या मालिकेचे लेखक आणि निर्माते आहेत. या वेबमालिकेचे दिग्दर्शन क्रिक्बाय यांनी केले आहे.

कलाकार – माईक मायर्स, जेनिफर साऊंडर, जेरेमी आयर्न्‍स, केन जियॉग, लिडिया वेस्ट, डेबी मझर, रिचर्ड मॅकएबे, किगन मिशेल की  कधी –  ५ मे  कुठे – नेटफ्लिक्स