दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री काजल अगरवाल. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत काजलने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीची लोकप्रियता आता विदेशापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच सिंगापूर येथील मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मादाम तुसाँमध्ये पहिल्यांदाच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचा पुतळा उभारण्यात आला आहे. यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा येथे पुतळा तयार करण्यात आला आहे.

सिंगापुरमध्ये नुकतंच काजलच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. काजलने स्वत:च्या हाताने या पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी तिच्यासोबत बहीण आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी काजल प्रचंड खुश असून तिने तिच्या पुतळ्यासोबत अनेक फोटोही काढले आहेत.


काही दिवसांपूर्वी काजलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लवकरच तिच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज ५ फेब्रुवारी रोजी या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

वाचा : तारा सुतारियाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; करीना होणार नणंदबाई?

दरम्यान, काजल अग्रवालने २००७ मध्य तेलुगू सिनेमा ‘लक्ष्मी कल्याणम’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यासोबतच अजय देवगणसोबत ‘सिंघम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’मध्येही ती दिसली होती.