इंटरनेटच्या जगात यूट्युब चॅनेलचा खूपच बोलबाला आहे. गायक, सेलिब्रिटी, शेफ, मेकअप आर्टिस्टचे स्वत:चे युट्युब चॅनेल आहेत. या चॅनेलनां लाखोंनी व्ह्यूज आहेत. मात्र या सर्वात भारतीय कंपनी टी-सिरीजच्या यूट्युब चॅनेलनं बाजी मारली आहे. जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या युट्यूब चॅनेलच्या यादीत टी-सिरीज अव्वल आहे. विशेष म्हणजे युट्युबवर अनेक लोकप्रिय चॅनेल असताना टी- सिरीजच्या सबस्क्राइबरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका दिवसात १ लाख जणांनी टी-सिरीजचा यूट्युब चॅनेल सबस्क्राइब केला आहे, त्यामुळे हाही विक्रम टी- सिरिजच्या नावे आहे.

२०१० मध्ये टी-सिरीज कंपनी यूट्युबवर सक्रिय झाली. तेव्हापासून आपल्या आगामी चित्रपटाच्या त्यातील गाण्याच्या च्या प्रसिद्धसाठी टी-सिरीज यूट्युबचा वापर करत आहे. टी- सिरीज ही म्युझिक बरोबर अनेक चित्रपटाची निर्माती कंपनीदेखील आहे. १९८० मध्ये गुलशन कुमार यांनी या कंपनीची स्थापना केली. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित ‘मोगुल’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून टी- सिरीज कंपनी कशी उभी राहिला हा प्रवासही उलगडणार आहे.  टी सिरीजनं PewDiePie च्या युट्यूब चॅनेललाही मागे टाकलं आहे. तो स्वीडीश यूट्युबर आणि कॉमेडिअन आहे.