‘ये मेरी स्टाईल है’ असं म्हणत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी स्वत: फॅशन डिझायनर होताहेत. त्यांच्या नावाचे ब्रॅण्ड येताहेत. कंगना रणौत, दीपिका, आलिया, श्रद्धा, हृतिक, जॉन, सोनम, मलायका, बिपाशा, शिल्पा यांनी आपापले फॅशन ब्रॅण्ड्स आणले होते. स्वतःचे फॅशन ब्रॅण्डस सुरु करण्यात अभिनेत्यांपेक्षाही अभिनेत्रीच पुढे असल्याचं दिसून येत. थोडक्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकही नायिका या फॅशन ब्रॅण्डच्या बिझनेसमध्ये मागे नाही. मराठीमध्ये मात्र सीन थोडा वेगळा आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आत्ता कुठे फॅशन सीरियसली घ्यायला सुरुवात केली आहे. त्यात स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड सुरू करण्यामध्ये तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्री आघाडीवर आहेत.

जवळपास दोन वर्षांपूर्वी तेजस्विनी आणि अभिज्ञा यांनी ‘तेजाज्ञा’ या फॅशन ब्रॅण्डला सुरुवात केली. भारतीय स्त्रीच्या वस्त्रांमधील आभूषण म्हणजेच साडी. त्यातून ‘खणाची साडी’ ही महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींनी खणांच्या साडय़ांना एका वेगळ्या रंगाढंगात पुढे आणलं. केवळ साड्यांपुरता मर्यादित न राहता आता त्यांनी वेस्टर्न कपड्यांनाही पारंपारिक तडका देत नवे कलेक्शन बाजारात आणले आहे. ट्रेण्डी तरीही पारंपारिक अशा लूकमधील फोटो तेजस्विनीने ट्विट केला आहे. तिचा हा नवा लूक नक्कीच लक्षवेधी आहे. तेजस्विनीने यात हिरव्या रंगाचा शॉर्ट फ्रॉक घातला आहे. विशेष म्हणजे हा फ्रॉक खणाच्या कापडापासून तयार करण्यात आलाय. डोक्यावर पुणेरी पगडी, नाकात चांदीची नथ कपळावर चंद्रकोर आणि पायात कोल्हापुरी असा हा तिचा लूक लक्षवेधी ठरतोय.

Mumbai Maharashtra Day 2024 Mumbai wants more autonomy
मुंबई: मुंबईला हवी अधिक स्वायत्तता !
Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर

खणाचा कपडा वापरून वेस्टर्न आउटफिट्स बनवण्याची ही संकल्पना नक्कीच भन्नाट आहे. असेच आणखी काही वेस्टर्न आउटफिटमधील फोटो तेजस्विनीने ट्विट केले आहेत.