actress veena kapoor murdered by son in juhu mumbai here is shocking reason | मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर | Loksatta

मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर

जुहूमधील एका फ्लॅटमध्ये एका मुलाने स्वतःच्या ७४ वर्षीय आईची हत्या केली आहे. हत्या झालेली महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत

मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर
(फोटो सौजन्य- नीलू कोहली इन्स्टाग्राम)

मुंबईतील जुहू भागात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे टीव्ही जगतात खळबळ माजली आहे. जुहूमधील एका फ्लॅटमध्ये एका मुलाने स्वतःच्या ७४ वर्षीय आईची हत्या केली आहे. हत्या झालेली महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत. याची माहिती टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

नीलू कोहली यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलं की, वीणा यांनी त्यांच्याबरोबर ‘मेरी भाभी’ या मालिकेत जवळपास ५ वर्षे काम केलं होतं. ही मालिका बंद झाल्यानंतर या दोघींनी आणखी एका मालिकेत एकत्र काम केलं होतं. मात्र करोनाच्या काळानंतर कामात व्यग्र झाल्यानंतर वीणा कपूर यांच्याशी आपला कोणताच संपर्क आला नव्हता असं त्यांनी सांगितलं आहे. वीणा यांचं निधन झालं आहे यावर विश्वास बसत नाही असंही नीलू कोहली यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- श्रद्धाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने १०० तास पाहिला जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा खटला; कारण…

नीलू कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये नीलू कोहली यांनी लिहिलं, “वीणाजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केलं.”

नीलू कोहली यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “चौकशी दरम्यान मुलाने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्याच्या रागाच्या भरात बेसबॉलच्या बॅटने अनेक वार करून आपल्या आईची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने जुहू भागातील १२ कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्या आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह कार्टनमध्ये पॅक केला आणि मुंबईपासून ९० किलोमीटर लांब माथेरानच्या जंगलात फेकला.”

आणखी वाचा-“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा कपूर यांचा लहान मुलगा सचिन कपूरने त्यांची हत्या त्याच १२ कोटींच्या फ्लॅटमध्ये केली. बॅटने डोक्यात वार करून मुलाने आईची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह फ्रिजच्या कार्टनमध्ये पॅक केला. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. एवढा मोठा बॉक्स जंगलात फेकण्यालाठी आरोपीने घरातील एका नोकराची मदत घेतली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 09:20 IST
Next Story
“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत