Premium

‘अस्मिता’ फेम मयुरी वाघने खरेदी केलं नवीन घर! गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या स्वप्नांच्या…”

मयुरी वाघचा नव्या घरात गृहप्रवेश, चाहत्यांना फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

mayuri wagh bought new home
मयुरी वाघने खरेदी केलं नवीन घर

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून आपल्या अभिनयनाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मयुरीने नुकतीच तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयुरीने नुकतंच तिच्या स्वप्नातील नवीन घर खरेदी केलं आहे. गृहप्रवेश आणि वास्तुशांती पुजेचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं.” असं कॅप्शन मयुरीने या फोटोंना दिलं आहे.

हेही वाचा : अक्षराचा जीव धोक्यात! अधिपती कशी करणार बायकोची मदत? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार मोठा ट्विस्ट

वास्तुशांतीला मयुरीने पिवळ्या रंगाची साडी, हातात मॅचिंग बांगड्या, कानात झुमके असा खास लुक केला होता. या फोटोंना मयुरीने नवीन घर, नवी सुरूवात, कृतज्ञता, आनंदी आयुष्य असे हॅशटॅग्स दिले आहेत.

हेही वाचा : “सेटवर फक्त ५ जण, सगळे मॉनिटर्स बंद अन्…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीनबद्दल तृप्ती डिमरीचं भाष्य; म्हणाली, “रणबीरने…”

दरम्यान, मयुरीने नवीन घर खरेदी केल्यावर कलाविश्वातील कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, अमृता पवार, अश्विनी कासार, मुग्धा गोडबोले या कलाकारांनी अभिनेत्रीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर मयुरीने २०१७ मध्ये अभिनेता पियुष रानडेशी लग्न केलं होतं. परंतु, लग्नानंतर काही वर्षांतच दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले. यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच पियुषने सुरुची अडारकरशी लग्नगाठ बांधली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asmita fame marathi actress mayuri wagh bought new home shares photo of vastushanti sva 00

First published on: 08-12-2023 at 10:07 IST
Next Story
अक्षराचा जीव धोक्यात! अधिपती कशी करणार बायकोची मदत? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार मोठा ट्विस्ट