मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे भाऊ कदम. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भाऊ कदम यांचा वेगळा असा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. भाऊ कदम त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलताना दिसतात. परंतु, त्यांची मोठी मुलगी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृण्मयी कदम एक सोशल मीडिया कॉन्टेन्ट क्रिएटर आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अनेकदा ती सोशल मीडियावर शेअर करीत असते. नुकतेच मृण्मयीने तिच्या बाबांना स्वकमाईतून शूज गिफ्ट केले आणि त्याचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला.

हेही वाचा… “इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टचं म्हणाला…

मृण्मयीचे रील्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. भाऊ कदम तिचे रील्स बघतात का? आणि तिचा भविष्यात अभिनय क्षेत्रात येण्याचा मृण्मयीचा विचार आहे का, असा प्रश्न भाऊ कदम यांना ‘लोकमत फिल्मी’च्या एका मुलाखतीत विचारला गेला.

त्यावर भाऊ कदम म्हणाले, “खरं तर मी तिला एकदा-दोनदा नको म्हटलं होतं. मलाच आधी यूट्यूब तेवढं माहीत नव्हतं. अभ्यास सो़डून हे काय करते, असा विचार मी केला आणि म्हणून मी तिला यासाठी नाही म्हणालो होतो. आमच्या मित्र-परिवारातलाच एक गृहस्थ आहे. तो आणि ती असे दोघंही व्हिडीओज वगैरे करीत असतात. त्यानंतर काही कालांतरानं मी तिचं काम बघायला लागलो आणि म्हणालो, चांगलं चाललंय यांचं. मस्त.”

भाऊ कदम पुढे म्हणाले, “तर आताही कधी कधी ते व्हिडीओज बघतो मी. घरी सगळे एकत्र असले की, आम्ही एपिसोड लावून बघतो. आता बरं वाटतं की, ती हे करते. कारण- सपोर्ट केल्यानंतर कुबड्या घेतल्यासारखं होतं ना. त्यापेक्षा मग ती स्वत: काय चुकेल ते चुकेल आणि तिचा निर्णय बरोबर असेल, तर चांगलंच आहे. आता तर ती त्या क्षेत्रात काम करतेय. साबळे पण त्या दिवशी म्हणाला की, चांगलं आहे. आम्ही सगळे ताडोबाला गेलेलो सगळे, तेव्हा तिनं व्हिडीओज शेअर केले होते.”

हेही वाचा… ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम यांनी नाकारली होती हिंदी कॉमेडी शोची ऑफर; किस्सा सांगत म्हणाले, “आपल्याला मराठीत जेवढा मान…”

“मी त्यांच्यात पडत नाही. ती करतेय तर करू दे, असं म्हणतो. आता ती करतेय ते बरं वाटतंय; पण आधी मी तिला नको म्हटलं होतं”, असंही भाऊ कदम म्हणाले.

हेही वाचा… ‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर नीलेश साबळे, ओंकार भोजने, स्नेहल शिदम व सुपर्णा श्याम या कलाकारांसह भाऊ कदम प्रेक्षकांना नव्यानं हसविण्यासाठी हजर झाले आहेत. कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात या कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केलीय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhau kadam denied daughter to become a content creator youtuber dvr