‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने काही दिवसांआधी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोमुळे डॉ. निलेश साबळे हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं. गेली दहा वर्षे या कार्यक्रमात त्याने सूत्रसंचालकाची भूमिका यशस्वीपणे निभावली. तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सध्या अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका सेल्फीची चर्चा रंगली आहे.

सेलिब्रिटींची मुलं प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय असतात. त्यांचे गोड फोटो व व्हिडीओ पाहणं सर्वांनाच आवडतं. काही कलाकार आपल्या वैयक्तिक जीवनाची प्रत्येक अपडेट चाहत्यांना देतात, तर काही सेलिब्रिटी आपल्या मुलांना कलाविश्वाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवणं योग्य समजतात. आजही अनेक कलाकारांनी आपल्या मुलांची झलक माध्यमांसमोर दाखवलेली नाही. ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळे याला सुद्धा गोड मुलगी आहे. तिचे फोटो तो फारसे शेअर करत नाही.

हेही वाचा : “नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

गेल्यावर्षी नवरात्रीत त्याने लेकीच्या हातावर मेहंदी काढलेला आणि सरस्वती पूजन करतानाचा असे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु, यात निलेशने लेकीचा चेहरा रिव्हिल केला नव्हता. आता अभिनेत्याने होळीच्या सणानिमित्त शेअर केलेल्या सेल्फीमध्ये लेकीचा चेहरा दाखवला आहे. या फोटोमध्ये निलेशची बायको गौरी देखील आहे.

हेही वाचा : अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न? प्रसिद्ध अभिनेत्याशी मंदिरात साधेपणाने लग्नगाठ बांधल्याची चर्चा

सध्या या फॅमिली फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, निलेश आणि गौरी २०१३ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली होती. तिथेच निलेशला गौरी आवडू लागली. लेखन, निवेदन, अभिनेता आणि दिग्दर्शन अशा विविध भूमिकेत दिसणारा निलेश सबळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कर्तृत्ववावर त्याने मराठी सिनेसृष्टीत ओळख निर्माण केली आहे. ​