कुशल बद्रिके मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून कुशल घराघरांत पोहचला. कुशलला विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही ओळखले जाते. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर कुशल मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान कुशलची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कुशलने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टबरोबर त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या दिग्दर्शकाची कामाप्रती निष्ठा, प्रेम पाहून तुम्ही कराल कौतुक, अपघात होऊनही…

कुशलने पोस्टमध्ये लिहिले “शोधून सापडणार नाहीत”, काही अशी माणसं आयुष्यातून निघून गेली ना, की माणसं “एकलकोंडी” होत जातात. फक्त स्वतःची होत जातात, स्वतः मधेच रमत राहतात.आणि मग, आयुष्यातून आणखीन माणसं गमाऊन बसू ह्या भीती पोटी हे लोक माणसं कमवायचीच राहून जातात. अश्या एकाकी माणसांना त्यांच्यावर सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. बास ! :- सुकून.”

कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर हटके कमेंट केल्या आहेत. “मागे वळून कोणाला पाहत आहेस, सांगू का तुझ्या बायकोला नाव…?” अशी कमेंट केली आहे. त्यावर कुशलनेही हसण्याचा इमोजी पोस्ट करत त्याला प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिनेता पुष्कर जोगनेही कमेंट करत लिहिले, “मी अजूनही आहे, मला तुझी खूप आठवण येते. पण तू व्यस्त असशील म्हणून तुला त्रास देत नाही. आय लव्ह यू कुश्या”, पुष्करच्या या कमेंटरवर कुशलने हार्ट इमोजी सेंड केला आहे.

हेही वाचा- “तुझी कोणी सध्या क्रश किंवा गर्लफ्रेंड आहे का?”, चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेता अजिंक्य राऊत म्हणाला, “माझी नवीन…”

कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आत्तापर्यंत कुशलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’, ‘रावरंभ’ चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. काही महिन्यांपूर्वीच कुशलचा ‘स्ट्रगलर्स साला’चा तिसरा सीझन प्रदर्शित झाला. आता लवकरच तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात तो झळकणार आहे.