१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ (CID) मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. याच मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ डिसेंबरला अभिनेते दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल केलं आहे. प्रकृती गंभीर असल्यामुळे सध्या दिनेश व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देत आहेत. संपूर्ण सीआयडी मालिकेच्या टीमला दिनेश यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे मालिकेतील सर्व कलाकार रुग्णालयात सतत दिनेश यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत आहेत. माहितीनुसार, १ डिसेंबरला दिनेश यांची प्रकृती गंभीर होती, पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतं आहेत.

हेही वाचा – प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर ‘झी मराठी’ने निर्णय घेतला मागे, आता लाडकी ‘३६ गुणी जोडी’ मालिका…

५७ वर्षीय दिनेश फडणीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, दिनेश फडणीस यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९९८ पासून ते २०१८ पर्यंत त्यांनी ‘सीआयडी’ मालिकेत फ्रेडरिक्सचं पात्र निभावलं होतं. त्यांनी साकारलेला फ्रेडरिक्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. याशिवाय दिनेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये छोटी भूमिका निभावली होती. याशिवाय काही चित्रपटांमध्ये त्यांनी कॅमिओ केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid fame dinesh phadnis battling for life after heart attack pps