Dinesh Phadnis Passed Away: ‘सीआयडी’ या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारणारे दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. दिनेश यांची प्रकृती खालावल्याने मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या मालिकेत ‘दया’ हे पात्र साकारणाऱ्या दयानंद शेट्टीने दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात १ डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं म्हटलं जात होतं, पण कालच दयानंद शेट्टीने हे वृत्त फेटाळलं होतं. त्यांचं लिव्हर डॅमेज असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

फिल्मफेअरने एक्सवर पोस्ट करत दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली. “क्राईम ड्रामा सीआयडीमधील फ्रेडीच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते दिनेश फडणीस यांचे यकृत निकामी झाल्याने वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले,” असं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दयानंद शेट्टीने ‘ई-टाइम्स’शी बोलताना या बातमीची पुष्टी केली. “होय, हे खरंय की ते आता आपल्यात राहिले नाहीत. रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. मी सध्या त्यांच्या घरी आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. सीआयडीमधील जवळपास सर्वजण इथे उपस्थित आहेत.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid fame dinesh phadnis passed away due to liver damage hrc