गोविंदाची भाची, ‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक व लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून आरतीने त्याला डेट करत असल्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता ती त्याच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. आरतीच्या बॉयफ्रेंडचं नाव दीपक चौहान आहे. आरतीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाल्याचं दिसत आहे.

आरतीने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या घरी फुलांची सजावट केल्याचं दिसत आहे. आरतीने लाल रंगाची साडी नेसली आहे, याचबरोबर तिने दागिने घातले आहे व हातात लाल रंगाच्या मॅचिंग बांगड्या भरल्या आहे. तिने केसात गजराही माळला आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. आरतीचे हे फोटो पाहून तिच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. चाहते व सेलिब्रिटीही तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.

Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

आरती सिंहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ‘लाल इश्क’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिचा मावसभाऊ कृष्णा अभिषेकनेही यावर कमेंट केली आहे, तर बिपाशा बासूनेही तिचं अभिनंदन केलं आहे. फोटोंवरील कमेंट्स पाहता आरतीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असं दिसतंय. पण अजून तिने लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

आरती सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये भाग घेतला होता. याशिवाय तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २००७ मध्ये ‘मायका’ नावाच्या मालिकेतून अभिनयक्षेत्रातून पदार्पण करणाऱ्या आरतीने ‘परिचय’, ‘थोड़ा है बस थोड़े की जरूरत है’, ‘वारिस’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय ती ‘उतरन’ व ‘देवों के देव महादेव’ मध्येही झळकली होती. आरतीचं नाव बॉयफ्रेंड दीपक चौहानआधी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडलं गेलं होतं.