Premium

“यंदा मला कोकणात जाता येणार नाही, कारण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला “माझ्या घरी…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला “माझ्या घरी…”

nikhil bane ganpati konkan
निखिल बनेने सांगितल्या कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी

कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सध्या अनेक चाकरमानी हे कोकणात रवाना झाले आहेत. त्यातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका विनोदवीराने खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. काही दिवसांपूर्वी निखिल बनेने त्याच्या कुटुंबीय कोकणात जात असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याचे कुटुंबीय चिपळूणला जाताना पाहायला मिळाले होते. आता याबद्दल निखिल बनेने एक मुलाखत दिली आहे. यात त्याने यंदा कोकणात जाता येणार नाही, असे सांगितले आहे.
आणखी वाचा : “…त्यांना बालपण भोगायलाच मिळत नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मालिकेत झळकणाऱ्या लहान मुलांबद्दल मांडले स्पष्ट मत

“बाप्पाबरोबरची आठवण सांगायची तर दरवर्षी मी गणेशोत्सवादरम्यान कोकणात असतो. क्वचितच मी मुंबईत आहे असं होतं. यावर्षी मला गणपतीला कोकणात जायला जमणार नाही. आताही निघताना माझ्या घरी गावी जायची तयारी सुरु होती. माझे आई-वडील गावी जातात. मी एकटाच गावी जात नाही. कारण मला सुट्टी नाही. त्यामुळे गावाला जाता येत नाही, याचं खूप वाईट वाटतंय”, असे निखिल बने म्हणाला.

“गावच्या आठवणी, गावचे गणपती ही सर्व मजा, मस्ती, धमाल मी मिस करणार आहे. पण ठीक आहे. कामामुळे कधीकधी आपल्याला जाता येत नाही. पण पुढच्या वर्षी मी नक्की जाईन आणि त्यावेळीच्या गंमतीजमती मी तुम्हाला नक्की सांगेन”, असेही त्याने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : गणपती बाप्पाला मोदक का आवडतात? ‘हे’ आहे कारण

दरम्यान निखिल बनेचे मूळ गाव चिपळूण येथे आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या गावातील घराची झलक दाखवली होती. त्याच्या गावचे घर टुमदार कौलारू आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरण, समुद्र याचेही काही फोटो त्याने शेअर केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra nikhil bane missing konkan village ganpati festival celebration nrp

First published on: 18-09-2023 at 17:15 IST
Next Story
अभिनेत्री सोनाली खरे, माधवी निमकर आणि तुषार देवलमध्ये आहे खास नातं; जाणून घ्या