Premium

“एक नवी स्वप्नवत सुरुवात…”, ऋता दुर्गुळेने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज

आता ऋताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

hruta durgule prateek shah new home
ऋता दुर्गुळे

‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऋता दुर्गुळे घराघरांत पोहोचली. महाराष्ट्राची क्रश म्हणून तिला ओळखले जाते. ऋताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून चाहत्यांनी मनं जिंकली. आता ऋताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋताने नुकतंच नवीन घर खरेदी केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. ऋताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती आणि तिचा पती प्रतीक शाह दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मला लोक होम-ब्रेकर म्हणतात, पण…”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “तेव्हा प्रेमात…”

“एक नवी स्वप्नवत सुरुवात. प्रेम आणि स्वप्न. नवीन घर, खास दिवस”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. यात ते दोघेही फारच आनंदात दिसत आहेत.

ऋताच्या या फोटोवर अनेक चाहते आणि मराठी कलाकार त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेत्री दीप्ती देवीने “प्रेम आणि फक्त प्रेम” असे म्हटले आहे. तर अभिनेता अजिंक्य राऊतने “टचवूड”, अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी यावर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…”

दरम्यान ऋता दुर्गुळेने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. त्या दोघांनी अत्यंत थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी हजेरी लावली. प्रतीक शाह हा दिग्दर्शक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress hruta durgule prateek shah buy new home share photo with post nrp

First published on: 03-12-2023 at 12:12 IST
Next Story
CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका; ५७ वर्षीय दिनेश फडणीस यांची व्हेंटिलेटरवर सुरू आहे मृत्यूशी झुंज