Premium

‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…”

‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी कुठे काम करत होती? वाचा…

aai kuthe kay karte fame gauri kulkarni talks about her debut in acting
'आई कुठे काय करत' फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, "पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…"

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यामुळे मराठी मालिकाविश्वातील ही लोकप्रिय मालिका ठरली आहे. अजूनही या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती. गौरी ही यशची प्रेयसी होती. काही महिन्यांपूर्वी तिची या मालिकेतून एक्झिट झाली. नुकताच तिने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा सांगितला. गौरी म्हणाली की, “सुरुवातीला आई-बाबांचा अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी नकार होता. कारण माझी नोकरी खूप चांगली होती. मी कॉन्सेंट्रिक्स टेक कंपनीत (Concentrix Tech Company) काम करत होती. ही कंपनी मायक्रोसॉफ्टची वेंडर आहे. म्हणजे मी थेट मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्टवरती काम करत होते. खूप कमाल नोकरी होती. मला ती नोकरी खूप आवडायची.”

हेही वाचा – Bigg Boss 17: बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘हा’ स्पर्धक घराबाहेर; अंकिता लोखंडेसह अभिषेक रडू लागले ढसाढसा

पुढे गौरी म्हणाली, “पण जेव्हा मी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आई-बाबांना धक्काच बसला. कारण त्यांना याबाबत माहित नव्हतं. त्यांना मी सरप्राइज दिलं होतं. मी त्यांना सांगितलं, २१ जानेवारी २०२० रोजी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत गौरीची एन्ट्री होतेय. घरी स्टार प्रवाह आहे? ते म्हणाले, हो आहे. मी म्हणाले, साडे सात वाजता लावा. एवढंच मी त्यांना सांगितलं होतं. पाच-साडेपाच दरम्यान ही गोष्ट सांगितली होती. त्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता. मग त्यांनी मला विचारलं, तुला हे करायचं आहे का? तुला वाटतंय का तू बरोबर निर्णय घेत आहेस? मी म्हणाले, हो मला वाटतंय मी हे करावं. मग त्यानंतर मला त्यांनी खूप पाठिंबा दिला.”

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: ‘या’ अटीवर मुक्ता सागरबरोबर लग्न करायला झाली तयार, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

दरम्यान, गौरी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने शर्वरी ही भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame gauri kulkarni talks about her debut in acting pps

First published on: 02-12-2023 at 18:34 IST
Next Story
Video : नव्या घरापाठोपाठ प्रार्थना बेहेरेने मुंबईत घेतलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह जोडीने केली पूजा, पाहा व्हिडीओ