‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमधून तिने अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्षे मालिकेत काम केल्यावर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली होती. परंतु, तुम्हाला माहितीये का मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. नुकत्याच सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नानंतर बदलेल्या आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

मृणाल दुसानिस म्हणाली, “आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एके दिवशी त्याचा मला फोन आला, फोटो पाठवले. आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं. आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”

“आमचं बोलणं झाल्यावर तो अमेरिकेहून इथे आला. आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही घरातच ३-४ मिनिटं बोलणं झालं. त्यानंतर आम्ही दोघं ६ महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की, हा मुलगा चांगला आहे आणि एकंदर मला तो आवडला होता. त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले असताना नीरज मला भेटायला आला होता. तेव्हा आमचं लग्न आधीच ठरलेलं होतं. असं साध्या सोप्या पद्धतीने अगदी लगेच सगळ्या गोष्टी जुळून आल्या.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.

हेही वाचा : Video : मराठी कलाकारांना पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, Filmfare मध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गेली चार वर्षे आपल्या नवऱ्याबरोबर मृणाल दुसानिस अमेरिकेत वात्सव्यास होती. तिला आणि नीरजला आता नुर्वी नावाची गोड मुलगी आहे. काही दिवसांआधीच अभिनेत्री पती व लेकीसह भारतात परतली. आता येत्या काळात मृणाल कोणत्या मालिकेत झळकणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.