Premium

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने नाश्ताला उपमा, पोहे नाही तर खाल्ला ‘हा’ पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री जुई गडकरीने नाश्ताला कोणता पदार्थ खाते पाहा…

Tharla tar mag fame jui gadkari
अभिनेत्री जुई गडकरीने नाश्ताला कोणता पदार्थ खाते पाहा…

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जुई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या दैनंदिन जीवनातील आणि मालिकेसंदर्भातील अपडेट सतत देत असते. तिचे व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जुईची ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेतील जुईची सायली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. प्रेक्षक वर्ग ‘ठरलं तर मग’ मालिकेवर भरभरून प्रेम करत असल्यामुळे टीआरपीमध्ये जुईची मालिका अव्वल स्थानावर आहे. अशा या लोकप्रिय जुईनं नुकताच आजच्या नाश्ताचा फोटो शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “…असं कोण करत?”; गिरीजा ओकने सांगितला शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला त्याने…”

अभिनेत्री जुई गडकरीने नाश्ताला उपमा, पोहे नाही तर वेगळा पदार्थ खाताना दिसत आहे. हा पदार्थ मुलींना अधिक आवडला जातो, असं म्हटलं जातं, तो म्हणजे ‘पाणीपुरी’. जुईनं सकाळी नाश्ताला ‘पाणीपुरी’ खाल्ली आहे. याचा फोटो तिनं इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून तिनं फोटोवर लिहीलं आहे की, “इथे माझ्यासारखं वेड कोणी आहे का?…माझ्या नाश्ता पाणीपुरी”

हेही वाचा – पक्षविरोधी कारवायांमुळे अर्चना गौतमीची तीन महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून झाली होती हकालपट्टी

दरम्यान, ‘ठरलं तर मग’च्या कालच्या भागात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सायलीवर हल्ला झाल्याचं दाखवण्यात आलं. पण सुदैवाने यावेळी अर्जुनने पाहिलं आणि जीवाच रान करून त्याने सायलीला रुग्णालयात दाखल केलं. पण आता हा हल्ला अर्जुन-सायलीच्या नात्याला कोणतं नवं वळण देईल? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharla tar mag fame jui gadkari ate pani puri on breakfast pps

First published on: 01-10-2023 at 13:37 IST
Next Story
“माझ्या मैत्रिणीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला पहिल्या प्रपोजचा मजेशीर किस्सा, म्हणाला…