Premium

Video : पांढरी दाढी, थकलेला चेहरा, विस्कटलेले केस; ‘तू तेव्हा तशी’मध्ये तरुण दिसणाऱ्या स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक

स्वप्निल जोशीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा नवा लूक दिसत आहे.

swapnil joshi video swapnil joshi
स्वप्निल जोशीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा नवा लूक दिसत आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी मराठीमधील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर बऱ्याच रोमँटिक भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. सध्या स्वप्निल झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये तो सौरभ हे पात्र साकारत आहे. ‘तू तेव्हा तशी’मध्ये त्याचा अगदी रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या स्वप्निलने नुकताच एक रिल व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. या व्हिडीओमध्ये स्वप्निलचा बदलता लूक समोर आला आहे. स्वप्निल अगदी थकलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सकाळी ५.३० वाजता उठल्यावर पुन्हा दोन मिनिटांनी उठतो असं म्हणतो पण त्यानंतर थेट सकाळी आठ वाजताच जाग येते. असं या रिल व्हिडीओमध्ये संवाद ऐकायला येत आहेत. स्वप्निल चेहऱ्यावरील हावभाव बदलत माझ्याबाबतही असंच घडतं असं सांगतो.

आणखी वाचा – कपाळी टिळा, खांद्यावर पदर; राणादा-पाठकबाई नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी, लग्नानंतर करताहेत देवदर्शन

स्वप्निलचा या व्हिडीओमधील लूक अगदी वेगळाच आहे. पण स्वप्निलचा हा रिल व्हिडीओ पाहून चाहते मात्र पोट धरून हसत आहेत. त्याच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच तीन हजारांपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi serial actor swapnil joshi share funny video on instagram his no makeup look viral see details kmd

First published on: 10-12-2022 at 15:06 IST
Next Story
‘वेड’नंतर आता जिनिलीया देशमुखची मराठी मालिकेत एंट्री; प्रोमो व्हायरल