Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्... | akshaya deodhar hardeek joshi wedding actress song for her husband video goes viral on social media | Loksatta

Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…

हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्नाची क्रेझ अजूनही कायम आहे. अक्षयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…
हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्नाची क्रेझ अजूनही कायम आहे. अक्षयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हार्दिक जोशी व अक्षया देवधर २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाचे बरेच व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अजूनही या दोघांच्या विवाहसोहळ्याची चर्चा रंगत आहे. हार्दिक-अक्षयाच्या लग्नाचं क्रेझ काही संपत नाही. अक्षयाचा संगीत कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया हार्दिकसाठी गाणं गाताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : मतभेद, मैत्री, काही वर्ष अफेअर, आठ वर्षांचा संसार अन्…; स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हार्दिक व अक्षयाने लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. हार्दिकनेही अक्षयासाठी सरप्राईज डान्स केला होता. अक्षयाने हिंदी रोमँटिक गाणं गात हार्दिकला सरप्राईज दिलं.

अक्षयाने ‘Shukarallah’ हे गाणं गायलं. तिच्या मैत्रिणींसह तिने हे गाणं गात हार्दिकला इम्प्रेस केलं. हार्दिकही अक्षया गाणं गात असताना भारावून गेला. दोघांनीही आता त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – आली रे आली आता दीपिका पदुकोणची बारी आली; रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’मध्ये साकारणार महिला पोलिसाची भूमिका

लग्नानंतरच्या पहिल्या कॉफी डेटचे फोटोही दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अक्षया-हार्दिक घराघरात पोहोचले. या मालिकेपासूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:35 IST
Next Story
Video : “‘बिग बॉस’ मला घरी जायचं आहे, इथून बाहेर काढा” टीना दत्ता ढसाढसा रडू लागली, कारण…