झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. वय विसरायला लावणाऱ्या या प्रेम कहाणीने टीआरपीच्या यादीतही बाजी मारली आहे. ईशा निमकर आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा आणि मालिकेत दररोज नव्यानं येणारं वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आता त्यात ‘जब वी मेट’ या हिंदी चित्रपटाचंही कनेक्शन पाहायला मिळणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद कपूर आणि करिना कपूर खान यांच्या ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या कथेशी मिळतीजुळती कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात इशा आणि विक्रम अनपेक्षितपणे रोड ट्रीपला जातात आणि ही ट्रीप दोघांसाठी मजेशीर ठरते. या ट्रीपमुळे हे दोघं एकमेकांच्या आणखी जवळ येतात. ‘जब वी मेट’ चित्रपटात ज्याप्रकारे गीत (करिना) आणि आदित्य (शाहिद) अचानकपणे भेटतात आणि पुढचा प्रवास एकत्र करतात त्याचप्रमाणे ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा आणि विक्रम भेटणार आहेत.

Marathi Theatre Classic, All the Best play, 50th show within three months, All the Best play Return, all the best return with new actors, marathi theatre, Shivaji mandir, theatre, marathi plays,
नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल

हे दोघे कसे भेटतात, भेटल्यावर नेमकं काय घडणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. मालिकेचा विषयही लोकांना वेगळा वाटतो आहे. वयाने मोठा असलेला विक्रम आणि त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची ईशा यांची ही प्रेमकथा लोकांना किती पचेल अशी शंका होती. मात्र मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.